devendra fadanvis

शिवसेना व भाजपामधील युती फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच तुटली होती त्यामुळेच त्यांना राज्याबाहेर नेऊन शिवसेनेला एक संदेश देण्याचाही भाजपा नेतृत्वाचा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीत वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्नदेखील केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यात भाजपासोबत नसले तरी केंद्रीय मंत्रिमंडळात एक जागा नेहमीच उपलब्ध राहील, असे संकेतही शिवसेनेला देण्यात आले आहेत. शिवसेनेचा निर्णय होताच मंत्रिमंडळात शिवसेनेला मंत्रिपद बहाल करण्यात येईल. दरम्यान, मोदी सरकार-2 चा मंत्रिमडळ विस्तार पुढील तीन-चार दिवसात होण्याची शक्यता आहे.

  दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा असतानाच महाराष्ट्रातून सहा जणांची नावे शर्यतीत असल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात शिवसेनेसोबत लवकरात लवकर युती व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे.

  शिवसेना व भाजपामधील युती फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच तुटली होती त्यामुळेच त्यांना राज्याबाहेर नेऊन शिवसेनेला एक संदेश देण्याचाही भाजपा नेतृत्वाचा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीत वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्नदेखील केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यात भाजपासोबत नसले तरी केंद्रीय मंत्रिमंडळात एक जागा नेहमीच उपलब्ध राहील, असे संकेतही शिवसेनेला देण्यात आले आहेत. शिवसेनेचा निर्णय होताच मंत्रिमंडळात शिवसेनेला मंत्रिपद बहाल करण्यात येईल. दरम्यान, मोदी सरकार-2 चा मंत्रिमडळ विस्तार पुढील तीन-चार दिवसात होण्याची शक्यता आहे.

  महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत असल्याची चर्चा आहे. यासोबतच त्यांना केंद्रात प्रतिनिधित्व देऊन शिवसेनेशी जवळीक करण्याचाही केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे.

  राज्यातून हिना गावित, उदयनराजे भोसले यांच्यासह नारायण राणेंची नावही चर्चेत आहे. राणेंमार्फत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासह कोकणात भाजपाचा विस्तार करण्यासाठीही मदत होण्याची शक्यता आहे.

  या शर्यतीत प्रीतम मुंडेंचेही नाव आहे. राज्यात मागासवर्गातून एकही नेता नसल्याने मुंडेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय रणजीतसिंह निंबाळकर यांचेही नाव शर्यतीत आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात भाजपाची पाळमुळे रुजविण्याचा नेृत्वाचा विचार आहे.

  असंतुष्टांचीही मनधरणी

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएत सहभागी अन्य पक्ष नव्हे तर भाजपाचेच नेते मोदी सरकारवर नाराज आहेत. यात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि तीरथसिंह रावत यांचाही समावेश आहे. या तिघांचीही अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. तथापि केंद्रात विस्तार करतेवेळी संधी देण्यात येईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. याशिवाय अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

  संघटनेतील नेत्यांनाही प्रतिनिधित्व

  कॅबिनेटमध्ये भजापा मीडिया सेलचे प्रमुख अनिल बलूनी, प्रवक्ते जफर इस्लाम, महामंत्री अनिल जैन, भूपेंद्र यादव यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्योतिरादित्य शिंदेंचाही समावेश होणार असल्याची चर्चा आहे. जेडीयूने रेल्वे मंत्रालयाची मागणी केली असल्याची माहितीही सूत्राने दिली.

  मंत्र्यांकडे दोनपेक्षा अधिक मंत्रालये

  मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. सद्यस्थितीत रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, हरदीपसिंह पुरी, नितीन गडकरी, नरेंद्र सिंह तोमरसह अन्य मंत्र्यांकडे दोन ते तीन मंत्रालयांचा अतिरिक्त प्रभार आहे.