भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांची धक्काबुक्की आणि शिवीगाळ

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना एका कार्यक्रमाला जाण्यापासून रोखण्यात आले त्यानंतर हा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये वाद झाल्यानंतर कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत असलेले पाहायला मिळत आहेत.

    दिल्ली : भाजपामधील अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

    ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना एका कार्यक्रमाला जाण्यापासून रोखण्यात आले त्यानंतर हा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये वाद झाल्यानंतर कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत असलेले पाहायला मिळत आहेत.

    मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये ही घटना घडली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष योगेश पाल गुप्ता आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आणि भाजपाचे नेते हरिओम शर्मा यांच्यामध्ये काही कारणांवरून वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हे धक्काबुक्कीत झाले आणि एकमेकांना अपशब्द बोलण्यात आले.

    पक्षांतर्गत असलेला वाद उफाळून आला आणि कार्यकर्ते भिडले. याच दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.