ब्लॅक फंगसचा थेट मेंदूवर आघात ; सुरतमध्ये दगावला पहिला रुग्ण

आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे फुफ्फुसे , डोळ्यांना धोका पोहोचत होता. मात्र आता ब्लॅक फंगस थेट मेंदूपर्यंत पोहोचला आहे. हा प्रकार पहिल्यांदाच पाहत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले

  सूरत:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या संक्रमणाबरोबर रुग्णांना ब्लॅक फंगस (Mucormycosis) आजार बळावत असल्याचे समोर आले आहे. देशात या आजाराने ५ हजार ५०० वर पोहचला आहे. यामुळे आतापर्यंत सव्वाशेहून अधिक जणांचा जीव गेला आहे.

  ब्लॅक फंगस थेट मेंदूवर वार करत असल्याचे दिसून आले आहे. गुजरातच्या सूरतमध्ये अशी पहिलीच केस आढळून आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.सूरतमध्ये एका २३ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली. उपचार वेळेत मिळाल्याने तरुणाने कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर त्याला ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आजार झाला. आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे फुफ्फुसे , डोळ्यांना धोका पोहोचत होता. मात्र आता ब्लॅक फंगस थेट मेंदूपर्यंत पोहोचला आहे. हा प्रकार पहिल्यांदाच पाहत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले

  यांना होऊ ब्लॅक फंगस
  – कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार घेताना ज्यांना स्टेरॉईड्स (डेक्सामिथाजोन, मिथाइल, प्रेडनिसोलोन) देण्यात आले आहेत.
  – कोरोना उपचारादरम्यान ऑक्सिजन सपोर्ट किंवा आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असल्यास
  – कॅन्सर, किडनी, ट्रान्सप्लांटची औषधं सुरू असल्यास