blue moon

सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे दरवर्षी १२ पूर्ण चंद्र दिसतात. मात्र, ‘ब्लू मून’च्या महिन्यात १३ पूर्ण चंद्र दिसतात. उगवणारा चंद्र खरेतर लालसर रंगाचा असतो.

दिल्ली : महिन्यातून एकदा होणारे पूर्ण चंद्राचे दर्शन चालू महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला इंग्रजीत ‘ब्लू मून’ (Blue Moon) असे म्हटले जाते. येत्या ३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ वाजता हा ‘ब्लू मून’ दिसणार आहे. या महिन्यातील पहिले पूर्ण चंद्रदर्शन २ ऑक्टोबरला पहाटे २.३५ वाजता झाले होते.

सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे दरवर्षी १२ पूर्ण चंद्र दिसतात. मात्र, ‘ब्लू मून’च्या महिन्यात १३ पूर्ण चंद्र दिसतात. उगवणारा चंद्र खरेतर लालसर रंगाचा असतो. पण चंद्र जेव्हा क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तीत प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात करड्या छटा मिसळल्याने तो निळसर भासू लागतो. मात्र ‘ब्लू मून’च्या व्याख्येचा त्याच्या रंगाशी काहीही संबंध नाही.

यापूर्वी आणि यानंतर…

यापूर्वी अशी घटना ३० जून २००७ रोजी घडली होती. यानंतर असा प्रसंग ३० सप्टेंबर २०५० रोजी येईल. २०१८ साली ३१ जानेवारी आणि ३१ मार्च अशा दोन दिवशी ‘ब्लू मून’ दिसले होते. पुढील ‘ब्लू मून’ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिसेल.