sunny deol

आरोग्य सचिव अमिताभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सनी देओला आपल्या मित्रांसमवेत मुंबईत येण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने कोरोना चाचणी केली. यामध्ये त्याचा अहवाल कोरोना सकारात्मक आला.

शिमला : भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओला याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी माहिती दिली. सनी देओल काही दिवसांपासून कुल्लू जिल्ह्यातील फार्म हाऊसवर राहत आहे. सनी देओल काही दिवसांनी मुंबईला परत येणार होता.

आरोग्य सचिव अमिताभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सनी देओला आपल्या मित्रांसमवेत मुंबईत येण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने कोरोना चाचणी केली. यामध्ये त्याचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. सनी देओलला कोरोना झाल्याची माहिती मंगळवारी रात्री उशीरा समजली.

काही दिवसांपूर्वीच सनी देओलची मुंबईत खांद्याची सर्जरी करण्यात आली होती. यानंतर तो आराम करण्यासाठी मनाली येथील फार्म हाऊसवर राहायला गेला होता. परंतु आता सनी देओल मुंबईत परतत होता.