शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बॉक्सर विजेंदर सिंग मैदानात; खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा दिला इशारा

दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बॉक्सर विजेंदर सिंग (Boxer Vijender Singh) देखील पोहोचला आहे. दरम्यान, कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna award) परत करणार आहे, असा इशारा (warn) विजेंदर सिंगने दिला आहे.

दिल्लीच्या (Delhi) सिंधू सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात ( New agricultural laws ) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आजचा ११ वा दिवस आहे. परंतु सिंधू सीमेवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बॉक्सर विजेंदर सिंग (Boxer Vijender Singh) देखील पोहोचला आहे. दरम्यान, कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna award) परत करणार आहे, असा इशारा (warn) विजेंदर सिंगने दिला आहे.

काय म्हणाला विजेंदर सिंग ?

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार आहे, असा इशारा विजेंदर सिंगने दिला आहे. खेलरत्न पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. विजेंदर सिंगसोबतच याआधीच पंजाब आणि हरियाणातून अनेक माजी खेळाडूंनी अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे.

शनिवारी दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेली पाचवी बैठक देखील निष्फळ ठरली. आता ९ डिसेंबर रोजी पुन्हा चर्चा होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केलं आहे. तर शेतकरी संघटनांकडून ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे.