लॉकडाऊनच्या जाचक नियमांपासून आता केंद्र सरकारनेच वाचवावं, व्यापाऱ्यांचं गृहमंत्री अमित शाहांना  पत्र

दिल्लीत चैत्र महिन्यात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. मात्र रात्रीच्या वेळी जमावबंदीचे आदेश असल्यामुळे व्यापारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुुळे व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून लॉकडाऊनबाबतचे निकष निश्चित करण्याची आणि त्यांचा पुनर्विचार करण्याची विनंती केलीय. 

    महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागलीय. दिल्लीतील कोरोना रुग्णांचे आकडे सध्या नवनवे उच्चांक प्रस्थापित करतायत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे व्यापारी मात्र धास्तावलेत.

    दिल्लीत चैत्र महिन्यात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. मात्र रात्रीच्या वेळी जमावबंदीचे आदेश असल्यामुळे व्यापारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुुळे व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून लॉकडाऊनबाबतचे निकष निश्चित करण्याची आणि त्यांचा पुनर्विचार करण्याची विनंती केलीय.

    महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही रात्रीची संचारबंदी सुरू झालीय. प्रत्येक राज्यात कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक राज्यातील नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून प्रत्येक राज्याने वेगवेगळे नियम बनवण्याऐवजी गेल्या वर्षीप्रमाणे केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान सूचना द्याव्यात आणि देशभरात एक धोरण राबवावे, अशी विनंती व्यापाऱ्यांच्या संघटनेनं गृहमंत्री अमित शाह यांना केलीय.

    महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावरही कॅटनं टीका केलीय. या निर्णयामुळे अर्थचक्राची गती मंदावणार असून राज्य सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या तिजोरीतही खडखडाट होईल, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.