डिसेंबरपर्यंत देशात २६७ कोटी लशी असतील, १८ वर्षांवरील सर्वांचे होईल लसीकरण; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विश्वास

देशाला या वर्षाच्या अखेरपर्यंत २६७ कोटी लस मिळतील, अशी आशा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आपल्या देशातील सर्व १८ वर्षांवरील लोकसंख्येचे लसीकरण करण्याच्या स्थितीत देश असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लसींचे ५१ कोटी डोस हे जुलैपर्यंत तर २१६ कोटी डोस हे डिसेंबरच्या मध्यापर्यंत उपलब्ध होतील. सर्व राज्यांतील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलीन वर्कर्सचे लसीकरण करावेच, असा आग्रहाचा सल्लाही हर्षवर्धन यांनी दिला आहे. कारण या सर्वांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

  नवी दिल्ली : देशाला या वर्षाच्या अखेरपर्यंत २६७ कोटी लस मिळतील, अशी आशा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आपल्या देशातील सर्व १८ वर्षांवरील लोकसंख्येचे लसीकरण करण्याच्या स्थितीत देश असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लसींचे ५१ कोटी डोस हे जुलैपर्यंत तर २१६ कोटी डोस हे डिसेंबरच्या मध्यापर्यंत उपलब्ध होतील. सर्व राज्यांतील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलीन वर्कर्सचे लसीकरण करावेच, असा आग्रहाचा सल्लाही हर्षवर्धन यांनी दिला आहे. कारण या सर्वांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

  प. बंगाल आणि पूर्वांचलातील आठ राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी ही महिती दिली आहे. प.बगाल, असाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील दररोजचे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यू दर जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या देशातील छोट्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा नवा ट्रेंड असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत सर्वच राज्यांनी सतर्कता बाळगण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

  यापूर्वी १२ मे रोजी हर्षवर्धन यांनी आठ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. यात कोरोना आणि लसीकरणाबाबत चर्चा झाली होती. या बैठकीला उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि तेलंगणा राज्याची उपस्थिती होती. सर्व राज्य सरकारे ही संयमाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ रोखायची असेल तर कोरोनाच्या नियमांचे पालन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.

  सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्रात

    महाराष्ट्र  1.56 कोटी
   राजस्थान  1.24 कोटी
   यूपी  1.19 कोटी
   गुजरात  1.10 कोटी
   दिल्ली  37.06 लाख
   कर्नाटक  1.13 कोटी
   केरल  85.35 लाख
   तमिलनाडु  54.50 लाख