OBC society aggressive on reservation issue BJP leader Pankaja Munde enters the fray

जेंव्हापासून विस्ताराची चर्चा सुरु झाली तेंव्हापासून मुंडे बहिणींचीच नावे पुढे येत होती. पण अचानक भागवत कराड यांचे नाव भाजपाने पोतडीतून बाहेर काढले आहे.

    मुंबई : भागवत कराड यांना मंत्रीपद हा पंकजा मुंडेना धक्का म्हणावा की गोपिनाथ मुंडेंच्या एका कडव्या समर्थकाला मोठे पद देऊन भाजपाने एक न्याय दिला असे म्हणावे अशी चर्चा भाजपा वर्तुळात रंगली आहे.

    जेंव्हापासून विस्ताराची चर्चा सुरु झाली तेंव्हापासून मुंडे बहिणींचीच नावे पुढे येत होती. पण अचानक भागवत कराड यांचे नाव भाजपाने पोतडीतून बाहेर काढले आहे.

    नाराज ओबीसी समाजातील वंजारा या मोठ्या वर्गाला कराड यांच्यारूपाने केंद्रीय मंत्रीमंडळात मिळणारे स्थान मराठवाड्यात भाजपाला बळकटी देणारेच ठरणार आहे.