बारावीच्या परीक्षा रद्द करा, अरविंद केजरीवाल यांची नरेंद्र मोदींकडे मागणी

केजरीवाल यांनी ट्विट करत केंद्र सरकारकडे परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे यंदादेखील पास पास केलं जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी केजरीवाल यांनी ही मागणी केली आहे.

    नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. बारावीच्या परीक्षेमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या चिंतेत आहेत. पालकांची आणि विद्यार्थ्यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये लसीकरणा शिवाय बारावीची परीक्षा होऊ नये, अशी अपेक्षा असं मत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

    अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

    केजरीवाल यांनी ट्विट करत केंद्र सरकारकडे परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे यंदादेखील पास पास केलं जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी केजरीवाल यांनी ही मागणी केली आहे.

    23 मे रोजी झालेल्या बैठकीत नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत, अशी भूमिका मांडली होती.