CBI arrests BJP corporator,

दिल्लीमधील वसंतकूंजमध्ये अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरकडे (builder) नगरसेवक मनोज यांनी १० लाख खंडणी मागितली होती. परंतु खंडणीचे (ransom) पैसे नगरसेवकाच्या ( BJP corporator) हातात देईल असे बिल्डरने सांगितले. यांनंतर बिल्डरने सीबीआयकडे खंडणीविरोधात तक्रार दाखल केली.

दिल्ली : सीबीआयने (CBI) खंडणी प्रकरणात भाजपच्या नगरसेवकास अटक (CBI arrests BJP corporator) केली आहे. अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरला धमकावत खंडणीची (ransom ) मागणी भाजप नगरसेवकाने (corporator)  केली होती. ही खंडणी घेताना सीबीआयच्या टीमने रंगेहाथ पकडले आहे. सदरची घटना दिल्लीतील वसंतकुंज भागातील आहे. तसेच खंडणी घेणाऱ्या नगरसेवकाचे नाव मनोज महलावत असे आहे.

काय आहे घटना, जाणून घ्या

दिल्लीमधील वसंतकूंजमध्ये अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरकडे नगरसेवक मनोज यांनी १० लाख खंडणी मागितली होती. परंतु खंडणीचे पैसे नगरसेवकाच्या हातात देईल असे बिल्डरने सांगितले. यांनंतर बिल्डरने सीबीआयकडे खंडणीविरोधात तक्रार दाखल केली. सीबीआयच्या टीमसह सापळा रचून नगरसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले.

भाजप नगरसेवक मनोज महलावत यांना सीबीआयने अटक केली असून त्यांना न्यायालयात दाखल केले जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर खंडणी मागतिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.