परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीाय चौकशीचे आदेश; अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव?

परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीाय चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. राजीनामा दिल्यानंतर देखमुखांनी थेट दिल्ली गाठली. मात्र, या प्रकरणी आता त्यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.

    दिल्ली : परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीाय चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. राजीनामा दिल्यानंतर देखमुखांनी थेट दिल्ली गाठली. मात्र, या प्रकरणी आता त्यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.

    परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर चौकशीचे आदेश दिले आहेत.

    अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. तसेच, १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचाही आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला आहे.

    मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.