चॉकलेट बनवणाऱ्या कॅडबरी कंपनीवर सीबीआयचा छापा, १२ जणांवर गुन्हा दाखल

CBI च्या म्हणण्यानुसार, कॅडबरीने भ्रष्टाचार केला आहे. कंपनीने क्षेत्रनिहाय मिळणाऱ्या टॅक्समधील सवलतींचा गैरवापर केला आहे तसेच टॅक्सची चोरी केल्याचा आरोप आहे.

    नवी दिल्ली : सीबीआयने चॉकलेट बनवणाऱ्या कॅडबरी कंपनीवर धाड टाकली आहे. तसेच त्यांच्याविरोधात २४० कोटींच्या फ्रॉडचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅडबरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड २०१० पासून पूर्णपणे अमेरिकन स्नॅक्स कंपनी मॉन्डलीजची आहे.

    CBI च्या म्हणण्यानुसार, कॅडबरीने भ्रष्टाचार केला आहे. कंपनीने क्षेत्रनिहाय मिळणाऱ्या टॅक्समधील सवलतींचा गैरवापर केला आहे तसेच टॅक्सची चोरी केल्याचा आरोप आहे.

    कंपनीने सेंट्रल एक्साइजच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून सरकारला टॅक्सच्या रुपात २४१ कोटींचा चुना लावला आहे. आर्थिक अनियमिततेचं हे प्रकरण २००९-११च्या दरम्यानचं असल्याचं सांगण्यात येतंय. प्राथमिक तपासानंतर CBI ने FIR दाखल केली आहे. आपल्या FIR मध्ये CBI ने कंपनीवर अनेक प्रकारचे आरोप लावले आहेत.