Exams

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष शाळेत जाऊन पेपर लिहावा लागणार आहे. सहामाही परीक्षा ज्याप्रमाणे ऑनलाईन झाल्या, तशा परीक्षा यापुढे नसतील, असे संकेत सीबीएसईनं दिलेत. सीबीएसईचे संचालक डॉ. जोसेफ इमॅन्युअल यांनी सांगितलं, “परीक्षांच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत.

गेल्या नऊ महिन्यांपासून शालेय विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र जरी विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन असलं, तरी परीक्षा मात्र ऑनलाईन असणार नाही, तर ती ऑफलाईन असेल, असा निर्णय सीबीएसईनं घेतलाय.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष शाळेत जाऊन पेपर लिहावा लागणार आहे. सहामाही परीक्षा ज्याप्रमाणे ऑनलाईन झाल्या, तशा परीक्षा यापुढे नसतील, असे संकेत सीबीएसईनं दिलेत. सीबीएसईचे संचालक डॉ. जोसेफ इमॅन्युअल यांनी सांगितलं, “परीक्षांच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत.

सर्व संबंधित घटकांसोबत परीक्षांच्या तारखांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र हे निश्चित सांगू शकतो की परीक्षा ऑनलाईन असणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेत येऊन परीक्षा द्यावी लागेल. कोविडसंबंधातील सर्व निकषांचं त्यासाठी पालन करण्यात येईल. परीक्षेपूर्वी असणारी प्रॅक्टिकट परीक्षा कशी घ्यायची, याबाबतही आम्ही विचार करत आहोत.”