CDS चा अंतिम निकाल जाहीर ;  www.upsc.gov.in या वेबसाईटवर पहा  निकालाविषयी माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोग( यूपीएससी) नं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस( CDS Examination) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामध्ये १४७ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग( यूपीएससी) नं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस( CDS Examination) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामध्ये १४७ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं लेखी परीक्षा व मुलाखत घेल्यानंतर हा निकाल जाहीर केला आहे.

    उमेदवारांची मुलाखत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई आणि इतर ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एकूण १४७ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

    यूपीएससीकडून लेखी परीक्षा घेण्यात आल्यानंतर या उमेदवारांची मुलाखत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या पॅनेलनं घेतली होती.  निकालाविषयी माहिती कुठे मिळणार? सीडीएस परीक्षा २०२० दिलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल www.upsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.