अशी परिस्थिती असेल तरच लॉकडाऊन लावावा, केंद्र सरकारनं निश्चित केले लॉकडाऊनसाठीचे निकष, राज्यांना दिल्या सूचना

देशातील विविध राज्यांतील कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी असून लॉकडाऊन लावल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे कुठल्या परिस्थितीत लॉकडाऊन लावावा, याबाबत केंद्र सरकारनं काही निर्देश जारी केलेत. त्याचं पालन केलं, तर सरसकट राज्यभरात लॉकडाऊन न लावताही कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल, असं सांगितलं जातंय. 

  देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान घालतेय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र आता इतर राज्यांमध्येदेखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालल्याचं चित्र निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली आणि कर्नाटकनंही कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय.

  देशातील विविध राज्यांतील कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी असून लॉकडाऊन लावल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे कुठल्या परिस्थितीत लॉकडाऊन लावावा, याबाबत केंद्र सरकारनं काही निर्देश जारी केलेत. त्याचं पालन केलं, तर सरसकट राज्यभरात लॉकडाऊन न लावताही कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल, असं सांगितलं जातंय.

  लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेताना त्या त्या विभागातील लोकसंख्येच्या तुलनेत किती जणांना कोरोनाची बाधा होत आहे, नवे रुग्ण सापडण्याचा दर काय आहे, बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण किती आहे, अशा बाबींचा विचार करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे निकष सरकारनं निश्चित केलेत.

  लॉकडाऊनसाठीचे निकष

  • कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा सलग १ आठवड्यांपेक्षा जास्त काळ १० टक्क्यांहून अधिक असेल तर
  • हॉस्पिटलमधील बेड हे ६० टक्क्यांहून अधिक भरले असतील तर
  • संचारबंदीचा कालवाधी निश्चित करण्याची सूट स्थानिक प्रशासनाला
  • रात्रीच्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रकारची वाहतूक बंद
  • सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घालणे गरजेचे
  • लग्नासाठी ५० जणांना तर अंत्यसंस्कारांसाठी केवळ २० जणांना परवानगी द्यावी
  • राज्यातील आणि राज्याबाहेरील वाहतुकीवर बंदी नको