ऊस उत्पादकांना दिलासा, ६० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून मिळणारे उत्पादन आणि सबसिडी यांचा लाभ देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना होईल, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलीय. बुधवारी झालेल्या केंद्रीयम मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय.

देशात कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघत असताना केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. साखरेची निर्यात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून मिळणारे उत्पादन आणि सबसिडी यांचा लाभ देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना होईल, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलीय. बुधवारी झालेल्या केंद्रीयम मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय.

यावर्षी ६० लाख टन साखरेची निर्यात होणार असून त्यावर सरकारमार्फत शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल. या निर्णयामुळे देशभरातील ५ कोटी शेतकरी आणि ५ लाख कामगारांना लाभ मिळेल, असा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आलाय.