कोरोनामुळे चंद्रावरील स्वारी पोस्टपोन, ही असेल मोहिमेची नवी तारीख

गेल्या वर्षाच्या शेवटी म्हणजेच २०२० मध्ये चांद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात येणार होते. मात्र कोरोना संकटामुळे त्याची तारीख पुढं ढकलण्यात आलीय. आता २०२२ मध्येच चांद्रयान-३ प्रक्षेपित होऊ शकेल, अशी माहिती इस्त्रोचे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) संचालक के. सिवन यांनी दिलीय. चांद्रयान-३ सोबतच देशातील पहिली मानवी अंतराळ मोहिम गगनयानदेखील पुढे ढकलण्यात आली आहे. 

    पूर्ण जग गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी लढत आहे. भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला या कोरोना संकटाने ग्रासले आहे. त्यात आता इस्त्रोचाही समावेश झाल्याचं स्पष्ट झालंय.

    गेल्या वर्षाच्या शेवटी म्हणजेच २०२० मध्ये चांद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात येणार होते. मात्र कोरोना संकटामुळे त्याची तारीख पुढं ढकलण्यात आलीय. आता २०२२ मध्येच चांद्रयान-३ प्रक्षेपित होऊ शकेल, अशी माहिती इस्त्रोचे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) संचालक के. सिवन यांनी दिलीय. चांद्रयान-३ सोबतच देशातील पहिली मानवी अंतराळ मोहिम गगनयानदेखील पुढे ढकलण्यात आली आहे.

    २२ जुलै २०१९ या दिवशी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्यात आले होते. चंद्राच्या दक्षिण भागात रोव्हर उतरवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञ प्रयत्नशील होते. ७ सप्टेंबर २०१९ या दिवशी रोव्हरच्या सॉफ्ट लँडिंगचा अखेरचा टप्पा पार पडणार होता. मात्र शेवटच्या काही क्षणांत इस्त्रोचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि सॉफ्ट लँडिंग करण्यात भारताला अपयश आले. मात्र अशा प्रकारची पहिलीच मोहिम असल्यामुळे सॉफ्ट लँडिंगपर्यंत यशस्वी प्रवास करणे, हीदेखील मोठी कामगिरी असल्याचं सांगण्यात आलं होतं.

    पहिल्या प्रयत्नात अपूर्ण राहिलेले भारताचे स्वप्न आता चांद्रयान-३ च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व चाचण्या आणि पूर्वतयारीनंतरच प्रक्षेपण करणार असल्याचं सीवन यांनी म्हटलंय. तर गगनयान योजनेअंतर्गत दोन वेळा मानवरहित यान चंद्रावर सोडले जाणार आहे. या दोन वेळचे अनुभव लक्षात घेऊन तिसऱ्या वेळी मानवासह यान चंद्राकडे झेपावणार आहे.