आजपासून Driving License संबंधीच्या नियमांत बदल ; ‘या’ नियमांना करावे लागणार फॉलो

मागील अनेक दिवसांपासून सरकारने लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत तसंच यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली आहेत.ज्या ड्रायव्हिंग स्कूलमधून व्यक्ती ट्रेनिंग घेईल, ते ड्रायव्हिंग सेंटर पूर्णपणे मान्यताप्राप्त असणं गरजेचं आहे.

    नवी दिल्ली :  सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या अनेक काम केली जाऊ शकतात. वाहतूक मंत्रालयाने लायसन्स बनवण्यासाठी एक नियम केला आहे, यामुळे आता रजिस्टर्ड ड्रायव्हिंग सेंटर्समधून (Driving Centres) यशस्वीरित्या ट्रेनिंग पूर्ण करणाऱ्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट (Driving Test) द्यावी लागणार नाही.

    आज 1 जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी (Driving License) नियमांत बदल झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सरकारने लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत तसंच यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली आहेत.ज्या ड्रायव्हिंग स्कूलमधून व्यक्ती ट्रेनिंग घेईल, ते ड्रायव्हिंग सेंटर पूर्णपणे मान्यताप्राप्त असणं गरजेचं आहे.

    या सेंटरमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतरच लायसन्स मिळेल. या प्रक्रियेमुळए RTO मध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. ड्रायव्हिंग लायसन्ससाठीचा हा नियम आजपासून लागू झाला आहे.