एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींच्या विरोधात एनआयएकडून आरोपपत्र दाखल ; या कलमाचा आहे समावेश

दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठातील तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यासह विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांची भरतीही दहशतवादी कारवाया करण्यासाठी करण्यात आली होती

    भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषद प्रकरणातील २२ आरोपीच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अन लॉ फुल ऑक्टिव्हिटी (युएपीए), इंडियन पिनलकोड (आयपीसी) सारख्या विविध कलमाखाली तयार केलेले आरोप पत्र विशेष न्यायालयासमोर सादर केले आहे.
    एनआयएमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हिंसा भडकवणे, कायद्याने स्थापित सरकारविरुद्ध असंतोष पसरवणे, षड्यंत्र रचणे, अव्यवस्था निर्माण करणे जेणेकरून भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात येईल अशा प्रकारचे कृत्य करून राज्यातील सत्ता हस्तगत कारण्यासाठी सशस्त्र संघर्षातून जनता सरकार स्थापन करण्याचा होता.

    इतकेच नव्हे तर भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित एल्गार परिषद प्रकरणातच्या ड्राफ्ट चार्जशीटमध्ये एनआयएने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठातील तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यासह विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांची भरतीही दहशतवादी कारवाया करण्यासाठी करण्यात आली होती., म्हटले आहे .

    या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्यकर्ते रोना विल्सन, नागपूरस्थित वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक शोमा सेन, महेश राऊत, रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, वकील कार्यकर्ते सुधा भारद्वाज, तेलुगू कवी पी वरवरा राव, कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस आहेत. मृत स्टेन स्वामी, गौतम नवलखा, प्राध्यापक हनी बाबू, सागर गोरखा, रमेश गायचोर, ज्योती जगताप व फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.