०१ सप्टेंबरपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत; लागू होणार ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’

नियमानुसार, बँकेच्या सर्व खातेधारकांना 50 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. बँकेने चेक पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

  दिल्ली (Delhi) : ०१ सप्टेंबरपासून 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीचा चेक (Bank Check) जारी करण्यासाठी तुम्हाला काही जास्त नियमांचे पालन करावे (to follow a few more rules) लागणार आहे. बहुतांश बँकांनी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ (Positive Pay System) (पीपीएस) लागू करण्यास सुरुवात केली आहे. अधिकतर बँकांमध्ये ०१ सप्टेंबरपासून ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू होणार आहे.

  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (The Reserve Bank of India) चेक ट्रंकेशन सिस्टमसाठी (सीटीएस) (Cheque Truncation System) (CTS) ऑगस्ट 2020 मध्ये ‘पॉझिटिव्ह पे’ प्रणालीची घोषणा केली होती. या नियमानुसार, बँकेच्या सर्व खातेधारकांना 50 हजार किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. बँकेने चेक पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

  असे असतील नियम : (The New Rules Of Check Payments)
  १) आरबीआयच्या नियमानुसार, चेक जारी करण्याआधी तुम्हाला बँकेला याबाबत सूचित करावे लागेल; अन्यथा चेक स्वीकार केला जाणार नाही.
  २) या सिस्टममध्ये 50 हजारहून अधिकच्या चेक पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावे लागेल.
  ३) या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल.
  ४) त्याद्वारे चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील.

  ५) चेकचे पेमेंट करण्याआधी हा तपशील पुन्हा तपासला जाईल. जर यामध्ये काही गोंधळ असल्यास चेक रिजेक्ट होईल. ही सुविधा पूर्णपणे ऐच्छिक असेल.
  ६) दरम्यान या नियमामुळे वरिष्ठ नागरिकांवर विशेष प्रभाव पडेल, खासकरून जे अद्याप नेट बँकिंग वापरत नाहीत.
  ७) पॉझिटिव्ह पे सिस्टिम चेक ट्रंकेशन सिस्टिम अंतर्गत चेक क्लिअरिंगमध्ये फ्रॉडपासून सुरक्षा उपलब्ध करण्यासाठी आहे. चेक ट्रंकेशन सिस्टिम चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया आहे.

  ‘या’ बँकांनी लागू केला नियम : (Rules applied by these banks)
  Axis Bankसह काही बँकांनी 50 हजारांपेक्षा जास्त धनादेशांसाठी पीपीएस अनिवार्य केले आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना नेट/मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेला भेट देऊन बँकेला चेक तपशील द्यावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टिम 50000 किंवा त्यापेक्षा मोठ्या रकमेच्या चेक पेमेंटसाठी असणार आहे. मात्र Axis बँकेत पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेसाठी पीपीएस अनिवार्य असणार आहे.