मराठा आरक्षण प्रश्नासंबधी छत्रपती संभाजी यांनी घेतली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांची भेट

र्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणी मध्ये सध्या १०२ व्या घटनादुरुस्ती बाबतीत संदिग्धता निर्माण झाली असल्याने मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, राज्य मागासवर्ग आयोग व राज्य सरकार चे इतर मागास प्रवर्गातुन आरक्षण देण्याचे अधिकार या घटनादुरुस्ती नंतर अबाधित आहेत की नाही, हे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्पष्ट करावे- छत्रपती संभाजी

    दिल्ली : १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणीमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांची छत्रपती संभाजी यांनी भेट घेतली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांची एकत्रित भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणी मध्ये सध्या १०२ व्या घटनादुरुस्ती बाबतीत संदिग्धता निर्माण झाली असल्याने मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, राज्य मागासवर्ग आयोग व राज्य सरकार चे इतर मागास प्रवर्गातुन आरक्षण देण्याचे अधिकार या घटनादुरुस्ती नंतर अबाधित आहेत की नाही, हे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी आग्रहाची मागणी यावेळी केली. यावर बोलताना केंद्रीय मंत्री महोदयांनी राज्य सरकारचे अधिकार बाधित होत नसल्याचे स्पष्ट केले व तसे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वतीने केले जाईल असे सांगितले. यावेळी मराठा संघटनांचे राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव व शिष्टमंडळ उपस्थित होते. आजच्या या भेटीमुळे महाराष्ट्रासह २६ राज्यांना दिलासा मिळणार आहे.