पंतप्रधान मोदींवरच्या ‘त्या’ टीकेवर चिदंबरम यांनी मागितली माफी, म्हणाले…

पंतप्रधान मोदी राज्य सरकारांना दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करू नये, असे कुणीही म्हटलेले नाही, असे पी. चिदंबरम यांनी टीका करताना म्हटले होते. मात्र, सोशल मीडियावरील एक युझरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींकडे अशा पद्धतीची विनंती केल्याचे पत्र पोस्ट केले. राज्य सरकारला थेट लस खरेदी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती. याची माहिती एएनआयकडे विचारली होती. माझी चूक झाली. मी माझी भूमिका दुरुस्ती केल आहे, अशी कबुली देत पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे.

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली. त्यानंतर पी. चिदंबरम यांनी टीका केली यामध्ये पंतप्रधान मोदी राज्य सरकारांना दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करू नये, असे कुणीही म्हटलेले नाही. दरम्यान या टीकेनंतर चिदंबरम यांनी ‘मी चुकलो. मी माझी भूमिका दुरुस्त केली आहे. असा खुलासा केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्टि्ट केले आहे.

    १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे. २१ जूनपासून केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून लसीची खरेदी करून राज्यांना पुरवेल. त्यामुळे राज्यांना लसीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सोमवार रोजी लसीकरणासंदर्भात केली आहे. मोदी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.