LPG गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर चिदंबरम म्हणाले, मोदी है इसलिए…

दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 834.50 रुपये इतकी असणार आहे. सुधारित दर 1 जुलैपासून लागू असतील. दुसरीकडे गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 98.81 रुपये तर डिझेलची किंमत 89.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे.

    देशाच्या विविध भागांत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडल्यानंतर एलपीजीच्या किंमतीही गेल्या काही महिन्यांत वाढल्याचे दिसून येत आहेत. यावर कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. यावेळी ते म्हणाले, मोदी आहे तर सगळं शक्य (मोदी है, तो मुमकिन है) आहे. त्यांनी पुढे कशी महागाई वाढली हे देखील सांगितले, मोदी सरकार आणि एलपीजीचे दर 2020 ते 2021 पर्यंत नोव्हेंबर 2020 मध्ये 594 रुपये ते 1 जुलै 2021 पर्यंत 834 रुपये इतके झाले आहे.

    तेल कंपन्यांनी देशांतर्गत एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. आता दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 834.50 रुपये इतकी असणार आहे. सुधारित दर 1 जुलैपासून लागू असतील. दुसरीकडे गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 98.81 रुपये तर डिझेलची किंमत 89.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे.

    यासह १ मेपासून लिटरमागे 90.40 रुपयांपासून पेट्रोलची किंमत आता 98.81 रुपये प्रतिलिटर झाली आहे. गेल्या 60 दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर 8.41 रुपयांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील डिझेलची किंमतही गेल्या दोन महिन्यांत प्रतिलिटर 8.45 रुपयांनी वाढून 89.18 रुपये झाली आहे.