दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली अनलॉकची घोषणा

दिल्लीतल्या(Delhi) रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन (Lockdwon)लावण्यात आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असल्यानं दिल्लीतला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने(UnLock Delhi) हटवण्यात येईल.

    दिल्लीतला(Delhi) लॉकडाऊन(Lockdown) हळूहळू उठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी आज दिली आहे. दिल्लीतल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.आज त्यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली.

    दिल्लीतल्या रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असल्यानं दिल्लीतला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येईल.

    केजरीवाल म्हणाले की आम्ही दिल्लीची जनता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिल्लीतला लॉकडाउन हळूहळू हटवू. मात्र, यावेळी कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढणार नाही यासाठी काळजी घेऊ.


    मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले, दिल्लीतल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता  घट होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये बाधित आढळण्याचा दर १.५ टक्क्यांवर आला आहे तर जवळपास ११०० रुग्ण बाधित आढळले आहेत. कोरोना विरुद्धच्या या लढाईमध्ये दिल्लीवासियांची मेहनत फळाला येत आहे. दिल्लीतली परिस्थिती सुधारत चालली आहे. आणि म्हणूनच दिल्ली आता अनलॉकसाठी सज्ज आहे. बांधकाम क्षेत्र आणि कारखाने सोमवारपासून सुरु करण्यात येतील.

    केजरीवाल म्हणाले, कोरोना फक्त कमी झाला आहे, संपलेला नाही. म्हणूनच आपण दिल्लीला हळूहळू अनलॉक करत आहोत. एकावेळी उठवला तर लागण होण्याचं प्रमाण वाढू शकतं. या अनलॉकसाठी आम्ही मजुरी करणाऱ्या, गरीब लोकांना समोर ठेवून विचार केला आहे.