केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या नजरकैदेत ; आम आदमी पार्टीचा आरोप

केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाचक ठरणारे तीन शेतीविषयक कायदे लागू केल्याने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाने (AAP) आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( CM Arvind Kejriwal) यांना नजरकैदेत ठेवले आहे.

केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाचक ठरणारे तीन शेतीविषयक कायदे लागू केल्याने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाने (AAP) आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( CM Arvind Kejriwal) यांना नजरकैदेत ठेवले आहे.
तसेच कोणालाही अरविंद केजरीवाल यांना भेटू दिले नाही. तसेच, त्यांच्या घरातून कोणाला बाहेरही पडू दिले जात नाही. दिल्ली पोलिसांनी आमच्या आमदारांनाही मारहाण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी सिंधू बॉर्डरवर (Singhu Border) जाऊन शेतकरी आंदोलनाला सोमवारी भेट दिली होती. शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाने केलेलेल्या आरोपांचे खंडण करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री केजरीवाल हे काल सायंकाळी बाहेर गेले होते. तसेच त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी कोणालाही मज्जाव करण्या आला नाही.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले आहे. कोणालाही अरविंद केजरीवाल यांना भेटू दिले नाही. तसेच दिल्ली पोलिसांनी आमच्या आमदारांनाही मारहाण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने लावला आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांनी कारणाशिवाय आणि जबरदस्तीने बॅरिकेटींग केले आहे. दिल्ली पोलीस इतक्या पातळीला पोहोचले आहेत की, केजरीवाल यांच्या घरी कामासाठी जाणाऱ्या कामगारांनाही घरात प्रवेश नाकारला जात आहे. दरम्यान, आम्ही सर्वजण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराकडे मोर्चा काढणार आहोत तसेच मुख्यमंत्र्यांना नजरकैदेतून बाहेर काढा असे अवाहन करणार आहोत असेही सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.