मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी फाडली ‘कृषी कायद्याची’ प्रत

कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी चर्चा करण्यासाठी दिल्लीत विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होते. यावेळी या कृषी कायद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर कृषी कायदे नाकारण्याचा निर्णय झाला. यावेळी जय जवान-जय किसान असे नारेही दिले गेले

नवी दिल्ली: तीन नवीन कृषीकायद्यांच्या विरोधात दिल्ली हरियाणाच्या सीमेवर मागील २२ दिवसांपासून आंदोला सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलना पाठींबा दिला आहे. मात्र आज मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार असा प्रश्न विचारत कृषी कायद्याच्या प्रत फाडून टाकली. या आंदोलनात आतापर्यंत २० शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. देशातील शेतकरी भगतसिंह सारखे या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. परंतु मोदी सरकारने इंग्रजासारखे वागू नये असे टोलाही सरकारला लगावला आहे.

घाई घाईने हे तीन कायदे संमत करुन घेण्याची मोदी सरकारला काय गरज होती? असाही प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. शेतकऱ्यांसाठी आणले गेलेले हे कायदे काळे कायदे आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो. दिल्ली राज्यात हे कायदे लागू होणार नाहीत असेही अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले.

कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी चर्चा करण्यासाठी दिल्लीत विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होते. यावेळी या कृषी कायद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर कृषी कायदे नाकारण्याचा निर्णय झाला. यावेळी जय जवान-जय किसान असे नारेही दिले गेले

‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेली येथे रॅली काढून तीन कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगितले. भाजपाचे सगळे नेते हे पाठ केल्याप्रमाणे कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगत आहेत. शेतकरी देशात कुठेही त्याचा शेतमाल विकू शकतो. मात्र या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत. शेतकऱ्यांमध्ये कुणीही भ्रम पसरवलेला नाही. भाजपाच्या नेत्यांमध्ये भ्रम पसरवण्यात आला आहे.’ असेही अरविंद केजरीवाल म्हणाले