मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट; ‘या’ मोठ्या मुद्यांवर झाली चर्चा, भाजपला हरविण्यासाठी पुन्हा एकदा खेला होबे

 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पाच दिवसीय दौऱ्यात आज तिसऱ्या दिवशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या की, सोनिया गांधींसोबतची भेट अत्यंत सकारात्मक झाली. विरोधी पक्षांची एकी, पेगासीस आणि सध्याची राजकीय परिस्थिती यांवर चर्चा झाली.

    नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. सध्या देशभरात विरोधी पक्षांच्या एकजुटीवर चर्चा सुरू असतानाच ममतांनी ही भेट घेतली आहे. तसेच भाजपला हरविण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली आहे.

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पाच दिवसीय दौऱ्यात आज तिसऱ्या दिवशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या की, सोनिया गांधींसोबतची भेट अत्यंत सकारात्मक झाली. विरोधी पक्षांची एकी, पेगासीस आणि सध्याची राजकीय परिस्थिती यांवर चर्चा झाली. भाजपला हरविण्यासाठी एकत्रित यावे लागेल. पेगासीस मुद्द्यावर ममता म्हणाल्या, यावर सरकार उत्तर का देत नाही. सरकारने संसदेत उत्तर द्यावे.

    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट आणि चेहरा, यांवर बोलताना त्या म्हणाल्या, मी काही राजकीय ज्योतिषी नाही. त्यावेळच्या स्थितीवर सर्व अवलंबून असेल. जर कुणी दुसऱ्यानेही नेतृत्व केले, तरी समस्या नाही. त्या म्हणाल्या, कुणाला तरी नेतृत्व करावेच लागेल. वेळ आली, की चर्चा करू.