मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं मिशन २०२४, आज दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची शक्यता

विरोधी पक्षाचं कमान तुम्ही सांभाळणार का? असा विचारण्यात आलं असता मी काही राजकीय ज्योतिषी नाही. हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आज मी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठक आहे. संसदेच्या सत्रानंतर विरोधी पक्षांची बैठक व्हायला हवी, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

    दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मिशन २०२४ च्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी संपूर्ण विरोधी पक्षासोबत रणनिती आखणार आहेत.

    संपूर्ण देशात खेला होबे होणार आणि २०२४ सालची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार, असं विधान ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. विरोधी पक्षाचं कमान तुम्ही सांभाळणार का? असा विचारण्यात आलं असता मी काही राजकीय ज्योतिषी नाही. हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आज मी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठक आहे. संसदेच्या सत्रानंतर विरोधी पक्षांची बैठक व्हायला हवी, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

    सोनिया आणि केजरीवाल यांच्याशी भेट होणार आहे. लालू यादव यांच्याशीही चर्चा झाली आहे. सर्वजण एकत्र येऊ इच्छित आहेत. सोनिया गांधी देखील विरोधी पक्षांनी एकत्र यावं या भावनेच्या आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी भेट घेणार असल्याचं समजत आहे.