uddhav thakre

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi and Uddhav Thakre Meeting)यांची भेट घेऊन आल्यानंतर(CM And PM Meeting) महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन मुद्देसुदपणे माहिती दिली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्यासोबत व्यक्तिगत भेट झाली नाही. ही काही राजकीय भेट नव्हती. पण माझे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहे. मी काय नवाझ शरीफ (nawaz sharif) यांना भेटायला गेलो नव्हतो, असा ठाकरे स्टाईल टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery)यांनी लगावला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आल्यानंतर महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन मुद्देसुदपणे माहिती दिली. यावेळी, पंतप्रधानांसोबत तुमची व्यक्तिगत भेट झाली का, अशा प्रश्नांचा भडीमार पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केला.

    उद्धव ठाकरे म्हणाले की, मी कधीही गोष्ट लपवली नाही, आज आम्ही एकत्र सत्तेत जरी नसलो तरी आमचे नातेसंबंध हे चांगले आहे. पंतप्रधानांना भेटणे यात काही गैर नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला नव्हतो गेलो, असं रोखठोक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

    आम्ही तिन्ही पक्षाचे नेते जाऊन भेटून आलोय यामध्ये व्यक्तिगत भेटीचा मुद्दा कुठे आला. मला अजूनही जर मोदींना भेटण्याची इच्छा झाली आणि मी याबद्दल त्यांना विचारणा केली तर ते नाही म्हणणार नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

    मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.