भारतात मुलांची इम्युनिटी चांगली; एम्सचा दावा

मुलांच्या एकूण विकासात शालेय शिक्षणाचा अतिशय महत्त्व आहे. ऑनलाईन वर्गांपेक्षा मुलांना शाळेतील वर्गांमध्ये जाणे आवश्यक आहे. भारतात अतिशय कमी प्रमाणात मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना ती झाली आहे ते आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे लवकर बरे होण्यास सक्षम आहेत असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

  दिल्ली : लहान मुलांसाठी अद्यापही लस विकसीत झाली नसतानाच एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशातील शाळा उघडण्यावर विचार केला जावा, असे मत व्यक्त केले आहे. यामागे त्यांनी मुलांची इम्युनिटी चांगली असते, असा दाखलाही दिला. भारतात अनेक शाळा कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच बंद आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत काही ठिकाणी 10 वी आणि 12 वीचे वर्ग भरवण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा बंद करण्यात आले.

  मुलांच्या एकूण विकासात शालेय शिक्षणाचा अतिशय महत्त्व आहे. ऑनलाईन वर्गांपेक्षा मुलांना शाळेतील वर्गांमध्ये जाणे आवश्यक आहे. भारतात अतिशय कमी प्रमाणात मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना ती झाली आहे ते आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे लवकर बरे होण्यास सक्षम आहेत असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

  ऑफलाईन शिक्षणावर भर

  मुलांमंध्ये वयस्क लोकांपेक्षा अधिक प्रमाणात अँटिबॉडिज आहेत याचा खुलासाही सीरो सर्व्हेमध्ये झाला आहे. यामुळे शाळा उघडल्या गेल्या पाहिजे. जितके शाळेत शिक्षण सोपे असते तितके ते ऑनलाईनमध्ये नाही असे सांगत गुलेरिया यांनी ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाईन शिक्षणावरच भर दिला.

  सप्टेंबरपर्यंत मुलांसाठी लस

  दरम्यान, मुलांसाठी या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते, असा अंदाजही गुलेरिया यांनी व्यक् तकेला. मुलांवर सुरू असलेल्या कोव्हॅक्सीन चाचणीचा दाखला देत प्रारंभिची आकडेवारी दमदार असल्याचे ते म्हणाले. भारत बायोटेक मुलांवर भारतातील पहिल्या स्वदेशी लसीची चाचणी करीत आहे. जर लस निर्मिती कंपनीने सादर केलेली लस डीसीजीआयने स्वीकृत केली तर मुलांसाठी लसीला मंजुरी सप्टेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचेही गुलेरिया म्हणाले.