China accelerated movements near the border; Dragon builds highway near Arunachal

गलवान खोऱ्यात गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचारानंतर आपले सैन्य मागे हटविण्याचा दावा करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळच्या हालचालींचा वेग वाढविला आहे. चीनने तिबेटच्या दक्षिणपूर्व भागाच्या सुदूर भागात महामार्ग पूर्ण केला आहे जो अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळ आहे व भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान बनू शकतो. या महामार्गात 2 किलोमीटर लांब सुरूंगाचाही समावेश आहे. हा महामार्ग जगातील सर्वांत खोल दर्रे यारलुंग जांग्ब्लो ग्रँडदर्रेमधून जातो व संभवत: बायबंग काउंटीमध्ये संपतो. हा रस्ता अरुणाचल प्रदेशातील बिशिंग गांवाच्या सीमेजवळ आहे. बिशिंग गाव अरुणाचल प्रदेशच्या गेलिंग सर्कलमध्ये येते, जे मॅकमोहन सीमेला स्पर्श करते. मॅकमोहन लाईन चीन व भारता दरम्यान वास्तविक सीमा चिन्हित करते.

    दिल्ली : गलवान खोऱ्यात गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचारानंतर आपले सैन्य मागे हटविण्याचा दावा करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळच्या हालचालींचा वेग वाढविला आहे. चीनने तिबेटच्या दक्षिणपूर्व भागाच्या सुदूर भागात महामार्ग पूर्ण केला आहे जो अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळ आहे व भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान बनू शकतो. या महामार्गात 2 किलोमीटर लांब सुरूंगाचाही समावेश आहे. हा महामार्ग जगातील सर्वांत खोल दर्रे यारलुंग जांग्ब्लो ग्रँडदर्रेमधून जातो व संभवत: बायबंग काउंटीमध्ये संपतो. हा रस्ता अरुणाचल प्रदेशातील बिशिंग गांवाच्या सीमेजवळ आहे. बिशिंग गाव अरुणाचल प्रदेशच्या गेलिंग सर्कलमध्ये येते, जे मॅकमोहन सीमेला स्पर्श करते. मॅकमोहन लाईन चीन व भारता दरम्यान वास्तविक सीमा चिन्हित करते.

    चीन अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही व त्याचा दावा आहे की, ते दक्षिणी तिबेटमध्ये येते. हा हायवे भारतासोबत एलएसीजवळ रस्ते व सुरूंगाच्या निर्मितीच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग आहे. यामुळे चीनचे दूरचे भागातदेखील शहर व विमानतळाशी जोडले जातील.

    हा महामार्ग सुरू झाल्यामुळे आता तिबेटचा शहरी भाग निंगची व सीमेजवळील गावातील प्रवासाचा वेळ कमी होऊन 8 तास होईल. चीनच्या मेगा यारलुंग जांग्बो हायड्रो पावर प्रोजेक्टची योजना बनविण्यात देखील हा महमार्ग महत्त्वाची भूमिका निभावेल.

    चिनी मीडियानुसार, या महामार्गाची निर्मिती 16 मे रोजीच पूर्ण झाली होती. हा महामार्ग आपल्या डेडलाईनच्या 228 दिवसपूर्वीच तयार झाला आहे. यापूर्वी चीनने भारताच्या सीमेजवळ मेडोग व निंगचीदरम्यान 2,114 मीटर लांब सुरूंग व 67.22 किलोमीटरचा रस्तादेखील बनविला होता.