प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

दिल्ली (Dehli).  सीमेवरील चिनी लष्कराशी संबंधित तज्ज्ञांवरून चीन आणि अमेरिकेतील वाद पुन्हा वाढत चालला आहे. अमेरिकेच्या न्यायिक विभागाकडून चिनी लष्कराशी संबंधित तज्ज्ञांविरोधात खटले दाखल करण्यात आल्यामुळे आमच्या देशात राहत असलेल्या अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेऊ, असा इशारा चीनने आता अमेरिकेला दिला आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जनरलने ही माहिती दिली आहे.

अमेरिकन वृत्तपत्राने या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या दाखल्याने म्हटले आहे की, चिनी अधिकारी अनेक माध्यमांवर अमेरिकन सरकारच्या अधिकाऱ्यांना याबाबत इशारा देऊन चुकले आहे. अमेरिकेने चिनी अधिकाऱ्यांविरोधात कोर्टात चालविलेले खटले रद्द करावे, अन्यथा चीनमध्ये राहत असलेल्या अमेरिकन नागरिकांना चिनी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून अटक केली जाईल, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.

तत्पूर्वी, चीन सरकार अमेरिकन नागरिकांना अटक करू शकते आणि त्यांच्या बाहेर जाण्यावर निर्बंध आणू शकते, असे 14 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन प्रवासाबाबत जाहीर करण्यात आलेल्या इशाऱ्यात नमूद करण्यात आले होते. यामागे इतर देशांबरोबर तोलमोल करण्याचा चीनचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेतील चिनी दूतावासाने अद्यापपावेतो याबाबत कुठलेही निवदेन दिलेले नाही.

एफबीआयने केली ३ नागरिकांना अटक
चीन अमेरिकन तंत्रज्ञान आणि लष्करी माहिती चोरी करण्यासाठी सायबर अभियान राबवित असल्याचा आरोप अमेरिकेतील ट्रंप प्रशासनाने केला आहे. यामागे अमेरिकेला मागे टाकण्याचा चीनचा उद्देश आहे. दुसरीकडे, चीनने अमेरिकेचे हे आरोप फेटाळून लावले आहे. यापूर्वी, जुलै महिन्यात एफबीआयने 3 चिनी नागरिकांना अटक केली आहे, असे अमेरिकेच्या न्यायिक विभागाने सांगितले होते. त्यांच्यावर व्हिसासाठी अर्ज करताना चिनी लष्कराचे सदस्य असल्याबाबतची माहिती लपविल्याचा आरोप आहे. अमेरिकेने गेल्या महिन्यात चीनच्या एक हजार नागरिकांचा व्हिसा रद्द केला होता.