आरबीआयच्या अहवालात स्पष्टीकरण; लॉकडाऊनमध्ये 750 पट नोटा खराब झाल्या

कोरोनाची दुसरी लाट, त्यात लागलेल्या लॉकडाऊनचे निर्बंधामुळे लोकंही त्रस्त झाले आहेत. बऱ्याच जणांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण पुन्हा एकदा स्थिती रुळावर येण्याची वाट पाहत आहेत. दरम्यानच्या काळात अनेक जणांनी ऑनलाईन व्यवहारही बरेच केले. यात रोख रकमेची देवाणघेवाण कमीच झाली. तरीही या दोन वर्षात नोटांचा रंग मात्र पूर्वीच्या तुलनेत फिका का पडला, असा प्रश्न लोकांच्या मनात आला आहे. तथापि, कोरोनाकाळात 2000, 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचा रंग उडाला असल्याचेही दिसून आले असून याबाबत आरबीआयने (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) स्पष्टीकरण दिले आहे.

  दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट, त्यात लागलेल्या लॉकडाऊनचे निर्बंधामुळे लोकंही त्रस्त झाले आहेत. बऱ्याच जणांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर अनेक जण पुन्हा एकदा स्थिती रुळावर येण्याची वाट पाहत आहेत. दरम्यानच्या काळात अनेक जणांनी ऑनलाईन व्यवहारही बरेच केले. यात रोख रकमेची देवाणघेवाण कमीच झाली. तरीही या दोन वर्षात नोटांचा रंग मात्र पूर्वीच्या तुलनेत फिका का पडला, असा प्रश्न लोकांच्या मनात आला आहे. तथापि, कोरोनाकाळात 2000, 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचा रंग उडाला असल्याचेही दिसून आले असून याबाबत आरबीआयने (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) स्पष्टीकरण दिले आहे.

  750 पट वाढले खराब होण्याचे प्रमाण

  2018-19 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या जवळपास सहा लाख नोटा खराब झाल्या होत्या. तथापि, 2020-21 या आर्थिक वर्षात ही आकडेवारी वाढून 45.48 लाख कोटींवर पोहोचली. याचाच अर्थ 750 पट नोटा खराब झाल्या.

  1186 पट नोटांची स्थिती दयनीय

  एकीकडे 200 रुपयांच्या जवळपास एक लाख नोटा खराब झाल्या होत्या त्या तुलनेत 11.86 कोटी नोटांची स्थिती तर अत्यंत दयनीय होती. या सर्वांचे गणित केल्यास ते 1186 पट होते. अशाच प्रकारे 500 रुपयांच्या 40 पट नोटा खराब झाल्या आहेत. यासोबतच कमी रकमेच्या नोटा कमी प्रमाणत खराब झाल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

  सॅनिटायझेशन ठरले कारण

  कोरोना साथरोगाच्या प्रारंभीच्या काळात लोकं जागरूक झाले होते. त्यावेळी कोरोना संक्रमण नोटांमुळेही पसरू शकते, अशी चर्चा होती. कारण नोटच एक अशी वस्तू होती जी अनेक हातांचा स्पर्श होऊन परत येत होती. त्यावेळी नोटा धुवून प्रेस केल्यास विषाणू नष्ट होतो असाही समज होता. यासोबतच संक्रमणाच्या भीतीने लोकांनी सॅनिटायझेशनही मोठ्या प्रमाणात केले. त्यामुळे अशा नोटा खराब होण्याचे प्रमाणही वाढले. दुसरीकडे, लहान नोटांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाली व या नोटांना हवा लागल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात खराब झाल्या नाहीत.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा