Covin Portal's Gaudbengal; Registration is possible 7 times with different IDs

एका वेबसाईटने कोरोना व्हॅक्सिन घेतलेल्या 15 कोटी भारतीयांचा डाटा डार्क वेबवर लिक झाल्याचा दावा केला आहे. परंतु, आरोग्य मंत्रालय व सुरक्षा संशोधकांनी डाटा लिक घटनेस नकार दिला आहे. परंतु प्रकरणाचा तपास करण्याविषयी सांगितले आहे. कोविन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशातील कोविड-19 व्हॅक्सिनेशनचा स्लॉट बुक होतो. कोविनवर युजर्सला स्लॉट बुक करण्यासाठी आपले आधारकार्ड किंवा दुसरे एखादे सरकारी ओळखपत्र, फोन नंबर व लोकेशनसारखी माहिती द्यावी लागते. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 150 दशलक्ष वापरकर्त्यांचे फोन नंबर व आधारकार्डची माहिती लिक झाली आहे. डेटा लिक मार्केटवर हा दावा करण्यात आला आहे की, भारतात कोविड-19 व्हॅक्सिन घेणाऱ्या नागरिकांच्या माहितीचा डेटाबेस 800 डॉलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला होता. कथित लिकच्या या डेटामध्ये व्हॅक्सिनसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या नागरिकांचे नाव, आधारक्रमांक, लोकेशन व फोननंबर सहभागी आहेत. वेबसाईटने दावा केला आहे की, डेटाचे ओरिजिनल लिकर नाही परंतु एक रिसेलर आहे.

    दिल्ली : एका वेबसाईटने कोरोना व्हॅक्सिन घेतलेल्या 15 कोटी भारतीयांचा डाटा डार्क वेबवर लिक झाल्याचा दावा केला आहे. परंतु, आरोग्य मंत्रालय व सुरक्षा संशोधकांनी डाटा लिक घटनेस नकार दिला आहे. परंतु प्रकरणाचा तपास करण्याविषयी सांगितले आहे. कोविन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशातील कोविड-19 व्हॅक्सिनेशनचा स्लॉट बुक होतो. कोविनवर युजर्सला स्लॉट बुक करण्यासाठी आपले आधारकार्ड किंवा दुसरे एखादे सरकारी ओळखपत्र, फोन नंबर व लोकेशनसारखी माहिती द्यावी लागते. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 150 दशलक्ष वापरकर्त्यांचे फोन नंबर व आधारकार्डची माहिती लिक झाली आहे. डेटा लिक मार्केटवर हा दावा करण्यात आला आहे की, भारतात कोविड-19 व्हॅक्सिन घेणाऱ्या नागरिकांच्या माहितीचा डेटाबेस 800 डॉलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला होता. कथित लिकच्या या डेटामध्ये व्हॅक्सिनसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या नागरिकांचे नाव, आधारक्रमांक, लोकेशन व फोननंबर सहभागी आहेत. वेबसाईटने दावा केला आहे की, डेटाचे ओरिजिनल लिकर नाही परंतु एक रिसेलर आहे.

    या संपूर्ण प्रकरणी आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सरकारने असा कोणताही रिपोर्ट असल्याचे फेटाळले आहे व सांगितले की, कोविन पोर्टल पूर्णपणे सुरक्षित आहे व कोणत्याही भारतीयाचा डाटा चोरी गेलेला नाही. असे अनेक रिपोर्ट समोर येत आहे ज्यात कोविन हॅक झाले असल्याचे सांगण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

    परंतु ही सर्व माहिती बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. पोर्टलवर असलेली माहिती सुरक्षित आहे. तसेच प्रकरणाचे गांभीर्य पाहता याविषयीचा तपास कम्प्युटर इमरज्न्सी रेस्पॉन्स टीमकडून करण्यात येत आहे.

    हे सुद्धा वाचा