कॉलेजियमने केंद्राला केली शिफारस; देशाला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश

आजवरच्या देशाच्या इतिहासात सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशपदी एकाही महिलेला संधी मिळालेली नाही. पहिल्या महिला सरन्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी देशाला 2027 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. सरन्यायाधीश न्या. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीनंतर नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली.

  दिल्ली: सुप्रीम कोर्टातील नऊ रिक्त जागांसाठी कॉलेजियमने केंद्र सरकारला शिफारस पाठविली आहे. त्यामध्ये तीन महिलांच्या नावांचा समावेश आहे. तसेच एका ज्येष्ठ वकिलांची थेट सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशी मान्य झाल्यास भविष्यात न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि पी. एस. नरसिंह यांना भारताच्या सरन्यायाधीश पदाची संधी मिळू शकते. त्यामध्ये न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या रूपात भारताला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

  आजवरच्या देशाच्या इतिहासात सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशपदी एकाही महिलेला संधी मिळालेली नाही. पहिल्या महिला सरन्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी देशाला 2027 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. सरन्यायाधीश न्या. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीनंतर नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली.

  नवरत्नांची शिफारस

  हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती

  बी. व्ही. नागरत्ना : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती

  बेला त्रिवेदी : गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती

  ज्येष्ठ वकील पी एस नरसिंह : थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदासाठी शिफारस

  ए. एस. ओका : कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

  विक्रम नाथ : गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

  जे. के. माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

  सी. टी. रवींद्रकुमार : केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

  एम. एम. सुंदरेश : मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

  एक संस्था म्हणून सुप्रीम कोर्ट माध्यमांचे स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या अधिकारांचा सन्मान करतो. न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया प्रलंबित झाली तर माध्यमांचा एक वर्ग त्यावर प्रतिक्रिया देतो आणि त्यामुळे विपरित परिणाम होतो. बजेबाबदार वृत्तांमुळेही प्रतिभावंतांचा मार्ग खुंटतो. अशा गंभीर प्रकरणात माध्यमांनी अंदाज बांधू नयेत व संयम बाळगावा.

  - एन.व्ही. रमण्णा, सरन्यायाधीश