विजय मल्ल्याला जबरदस्त झटका; 6200 कोटींचे शेअर्स विकून बँका करणार वसुली

फरार आर्थिक गुन्हेगार घोषित झालेल्या विजय मल्ल्याच्या मालमत्तेवर आता टाच येण्याची चिन्हे आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी आता स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या मल्ल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर्स विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेल्या 6200 कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे. यूनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील मल्ल्याच्या हक्काचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जातील.

  दिल्ली : फरार आर्थिक गुन्हेगार घोषित झालेल्या विजय मल्ल्याच्या मालमत्तेवर आता टाच येण्याची चिन्हे आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी आता स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या मल्ल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर्स विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेल्या 6200 कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे. यूनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील मल्ल्याच्या हक्काचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जातील.

  डीआरटीची देखरेख

  मल्ल्याच्याशेअर्सची विक्री बंगळूरूस्थित डेट रिकव्हरी ट्रिब्यूनलच्या (डीआरडटी) देखरेखीत होणार आहे. ही बल्क डील जर अपयशी ठरली तर बँका शेअर्सची विक्री रिटेल मार्केटमध्ये करतील. याची प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होणार आहे.

  17 बँकांचे कर्ज थकित

  • मल्ल्यावर एकूण 17 बॅंकांचे थकित कर्ज आहे.
  • मल्ल्यावरील कर्जाची एकूण रक्कम 9000 कोटी रुपये इतकी आहे. या कर्जावरील व्याजाची रक्कम वेगळीच आहे.
  • मल्ल्यावर स्टेट बॅंक ऑफ इंडियाव्यतिरिक्त पंजाब नॅशनल बॅंक, आयडीबीआय बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, अलाहाबाद बॅंक, फेडरल बॅंक, अॅक्सिस बॅंक या बॅंकांचे कर्ज आहे.
  • या सर्वच बँकांनी वैयक्तिक गॅरंटीवर टप्प्याटप्प्याने कर्ज दिले होते.
  हे सुद्धा वाचा