परीक्षांचे आयोजन करण अत्यंत घातक ठरू शकते; आधी लसीकरण करा मग परीक्षा घ्या

देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तर, विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. त्यामुळे दिल्ली सरकार कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्याच्या बाजूने नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्यांदा लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यानंतरच परीक्षा घेणे सुरक्षित असू शकेल. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पुढे म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन करण अत्यंत घातक ठरू शकतो. अशी चूक देशासाठी खूपच महागात पडू शकते.

    दिल्ली : सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा रखडल्या आहेत. तर काही राज्यात परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्याचा धडाका लावला आहे. अशातच दिल्लीचे शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देण्याची मागणी केली आहे.

    यावेळी ते म्हणाले की, देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तर, विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. त्यामुळे दिल्ली सरकार कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्याच्या बाजूने नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्यांदा लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यानंतरच परीक्षा घेणे सुरक्षित असू शकेल. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पुढे म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन करण अत्यंत घातक ठरू शकतो. अशी चूक देशासाठी खूपच महागात पडू शकते.

    केंद्र सरकारने प्राधान्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण करायला हवे. त्यासाठी लस उत्पादक कंपनी फायझरशी यासंदर्भात बोलायला हवे. देशभरातील सर्व 1.4 करोड 12 वीच्या विद्यार्थ्यांचे आणि जळपास तितक्याचे शिक्षकांचे लसीकरण करायला हवे. केंद्र सरकारने जर लस उपलब्ध करून दिली. तर राज्य सरकारे एका आठवड्याच्या कालावधीत 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लस देऊ शकतील. त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही सिसोदिया म्हणाले.