शरद पवारांकडून अमित शाहांचं अभिनंदन, दोन्ही नेत्यांमध्ये ‘या’ प्रश्नावर झाली सविस्तर चर्चा, राजकीय चर्चेला उधाण

शरद पवारांनी ट्वीट करून या भेटीविषयी माहिती दिली आहे. सर्वप्रथम मी अमित शाह यांचं देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं. या भेटीदरम्यान, आम्ही देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केली, असं शरद पवारांनी नमूद केलं आहे.

    नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या कार्यालयात या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सहकार श्रेत्रासह साखर उद्योग आणि त्यावरील प्रश्नांबाबच सविस्तर चर्चा झाली. तशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे.

    या बैठकीला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

    शरद पवारांचं ट्वीट