kamalnath and soniya gandhi

काँग्रेसमधील(Congress Meeting) अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत कमलनाथ यांना मोठी जबाबदारी मिळू शकते तर निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor)यांच्याविषयी बैठकीत चर्चा होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

    मध्य प्रदेशचे(Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री कमलनाथ(Kamalnath Meeting With Soniya Gandhi) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी १० जनपथ येथे पोहोचल्या आहेत.या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कमलनाथ यांना मोठी जबाबदारी मिळू शकते तर निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याविषयी बैठकीत चर्चा होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

    कार्यकारी अध्यक्षपदाबाबत काँग्रेस पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पदासाठी काँग्रेस आपला सर्वात निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ याचा विचार करत आहे. कमलनाथ यांना ही जबाबदारी मिळाली तर ती काँग्रेसमधील हा एक मोठा बदल असेल.

    सध्या केवळ काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची चर्चा आहे. पावसाळी अधिवेशनानंतर पक्षाचे अध्यक्ष निवडले जातील असे म्हटले जात आहे. तसेच पुढील वर्षी अनेक राज्यात निवडणुका असून काँग्रेसमध्येही अनेक प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. पंजाबमधील कलह देखील अजून संपलेला नाही. काँग्रेसमध्ये नाराज नेत्यांचा एक वेगळा गट पडला आहे.

    दुसरीकडे बैठकीत प्रशांत किशोर यांच्याबद्दल होत असल्याची अंदाज लावण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी चार तास चर्चा केली. त्यांना काँग्रेसमध्ये मोठ्या पदाची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांना काँग्रेसचा भाग बनून संघटन मजबूत करण्याचे सुचविले आहे. आता प्रशांत किशोर यांना निर्णय घ्यायचा आहे.