सुनंदा पुश्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस नेते शशी थरुर यांना न्यायालयाचा दिलासा

17 जानेवारी 2014 च्या रात्री सुनंदा पुष्कर दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूनंतर शशी थरूर यांच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता.

    पत्नी सुनंदा पुष्कर Sunanda Pushkar यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली न्यायालयाने आज बुधवारी काँग्रेस नेते शशी थरूर Shashi Tharoor यांची निर्दोष मुक्तता केली आहे. शशी थरूर यांना आयपीसीच्या कलम 498 ए (पती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून अत्याचार) आणि कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत आरोपी बनवण्यात आले होते.

    निकाल आपल्या बाजूने आल्यानंतर, थरूर यांनी न्यायाधीशांचे आभार मानले आणि सांगितले की, गेल्या साडे सात वर्षांपासून हा छळ होत होता आणि आता पण आता दिलासा मिळाला आहे.

    17 जानेवारी 2014 च्या रात्री सुनंदा पुष्कर दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूनंतर शशी थरूर यांच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. शशी थरूर हे या प्रकरणातील मुख्य आरोपी होते आणि दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

    29 सप्टेंबर 2014 रोजी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी एम्स रुग्णालयाच्या टीमने AIIMS Medical Board मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल दिल्ली पोलिसांना सुपूर्द केला. सुनंदाचा मृत्यू विषाने झाल्याचे या अहवालात म्हटले होते.

    दरम्यान, यापूर्वी 27 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती, परंतु या प्रकरणात आणखी काही कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मागून शशी थरूर यांच्या वतीने नवीन अर्ज देऊन निर्णय 18 ऑगस्टपर्यंत वेळ पुढे ढकलण्यात आला. व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुनंदा पुष्कर २०१० मध्ये काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर प्रसिद्धीझोतात आल्या होत्या.