सोनिया गांधींसोबत काँग्रेस नेत्यांची बैठक, राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी, नाराज नेते मात्र निवडणुकीसाठी आग्रही

ज्या नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं, त्यातील बहुतांश नेत्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत निवडणुका हा पारदर्शक पद्धतीनं घेतल्या जाव्यात, अशी मागणी केली. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक असो किंवा पक्षातील इतर पदांसाठी होणाऱ्या निवडणुका असोत, त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या, तर पक्षाची स्थिती सुधारेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी शनिवारी काँग्रेस नेत्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यात बैठकीत बहुतांश नेत्यांनी राहुल गांधींनाच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी केली. तर काही नाराजांनी मात्र अध्यक्षपदासाठी निवडणुका घ्यावात, अशी मागणी केली.

ज्या नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं, त्यातील बहुतांश नेत्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत निवडणुका हा पारदर्शक पद्धतीनं घेतल्या जाव्यात, अशी मागणी केली. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक असो किंवा पक्षातील इतर पदांसाठी होणाऱ्या निवडणुका असोत, त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या, तर पक्षाची स्थिती सुधारेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल, ती स्विकारायला आपण तयार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष कोण होणार, याचा फैसला निवडणूक करेल, अशी भूमिका राहुल गांधींनी घेतल्याचं सांगितलं जातंय. मात्र ज्या नेत्यांनी नाराजीचं पत्र लिहिलं होतं, त्यातील कुणीही राहुल गांधी असं म्हणाल्याचं सांगितलं नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, आपण पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा कायमच आदर करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्या आईवडिलांसोबतही काम केलं असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला उपयोग होत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. तर सोनिया गांधींनी सर्वांना एकत्र वाटचाल करण्याचं आवाहन केलं. लवकरच चिंतन शिबीर आयोजित करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

पक्षात जे असतं, ते दिसत नाही. जे दिसतं, ते असत नाही. पक्षातील सर्वांचा सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार नाराज नेत्यांसोबत बैठक घेण्याची कल्पना मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कललनाथ यांची होती.