राहुल गांधीना पुन्हा अध्यक्षपद देण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्यावी, या मागणीला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जोर आला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राहुल

 नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्यावी, या मागणीला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जोर आला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा विषय काढल्याचे बोलले जाते. 

काँग्रेस कार्यकारिणीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीची (एआयसीसी) वर्चुअल बैठक बोलवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

गहलोत यांच्या मागणीला पक्षातून काही नेत्यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. मात्र पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याबाबत राहुल गांधींनी मौन बाळगले आहे.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी केवळ भारत-चीन तणाव, कोरोना संकट, अर्थव्यवस्थेची स्थिती, इंधनाचे वाढते दर यावर चर्चा झाली, राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करण्याचा विषयच निघाला नाही, तुम्हाला ही बातमी कुठून मिळाली? असा प्रतिप्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केला.