काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष हवा! राहुल तयार नसतील तर पर्याय शोधावा लागेल; शशी थरुर यांच्या वक्तव्याने गोंधळ

सोनिया गांधी यांनी इतक्या वर्षांपासून पक्षाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे. त्यांनी पक्षाला बळकटी देण्याचे काम केले आहे. पण त्यांनी आता स्वत: आपल्याला पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. अशातच आता पक्षाला नव्या अध्यक्षाची नेमणूक करायची गरज आहे. या प्रक्रियेला आता गती देणे गरजेचे आहे, असेही थरूर म्हणाले.

    दिल्ली : काँग्रेसमध्ये कायमस्वरूपी अध्यक्षपदाचा शोध सुरू असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार शसी थरूर यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. कायमस्वरूपी अध्यक्षाची काँग्रेसला गरज आहे. माझ्यासारख्या जुन्या नेत्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आहे. राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. पण ते इच्छुक नसतील तर आता आम्हाला अध्यक्षपदासाठी पर्याय शोधावा लागेल, असे थरूर यांनी म्हटले आहे.

    सोनिया गांधी यांनी इतक्या वर्षांपासून पक्षाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे. त्यांनी पक्षाला बळकटी देण्याचे काम केले आहे. पण त्यांनी आता स्वत: आपल्याला पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. अशातच आता पक्षाला नव्या अध्यक्षाची नेमणूक करायची गरज आहे. या प्रक्रियेला आता गती देणे गरजेचे आहे, असेही थरूर म्हणाले.

    अलिकडेच, युवक काँग्रेसच्या वतीने राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी केली गेली आहे. गोव्यात झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत युवा काँग्रेसकडून राहुल गांधी यांची काँग्रेसच्या कायमस्वरुपी अध्यक्षपदी निवड करावी अशा मागणीचा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला होता.