शेतकऱ्यांना कुणी भडकावलं? का घेतलं जातंय दीप सिद्धूचं नाव?

दीप सिद्धू यानेच शेतकऱ्यांना भडकावले, असा आरोप भारतीय किसान युनियनचे हरियाणातील प्रमुख गुरनाम सिंग यांनी केलाय. गेल्या ६३ दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असणारे शेतकरी आंदोलन शांततेत सुरू होतं. मात्र प्रजासत्ताकदिनी आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दीप सिद्धूनं शेतकऱ्यांचे नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला, असा आरोप होतोय.

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत निघालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसाचारामुळे गालबोट लागलं. मात्र हे गालबोट लागण्याला एक व्यक्ती जबाबदार होती, असा आरोप सध्या केला जात आहे. ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब ध्वज फडकवला. यावरून सध्या देशभर वाद सुरू आहेत आणि दीप सिद्धू हे नाव समोर आले आहे.

दीप सिद्धू यानेच शेतकऱ्यांना भडकावले, असा आरोप भारतीय किसान युनियनचे हरियाणातील प्रमुख गुरनाम सिंग यांनी केलाय. गेल्या ६३ दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असणारे शेतकरी आंदोलन शांततेत सुरू होतं. मात्र प्रजासत्ताकदिनी आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दीप सिद्धूनं शेतकऱ्यांचे नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला, असा आरोप होतोय.

शेतकर्‍यांनी लाल किल्ल्याकडे येण्यास नकार दिला. मात्र तरीही त्यांना भडकावुन लाल किल्ल्याकडे नेलं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी झेंडा फडकावला, असा आरोप केला जातोय. दरम्यान, आंदोलन करण्याचा लोकशाहीतील अधिकार वापरून आम्ही निशाण साहिब ध्वज फडकवला. आम्ही तिरंगा हटवला नव्हता, असा दावा दीप सिद्धू यांने केलाय.

कोण आहे दीप सिद्धू?

दीप सिद्धू हा पंजाबी अभिनेता आणि गायक आहे. भाजप खासदार सनी देओल यांच्या प्रचारासाठी त्याला नियुक्त करण्यात आलं होतं लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर मात्र सनी देओल यांनी ट्विट केलं आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कुठलाही संबंध नसल्याचं म्हटले आहे. शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर पंजाबमधील विविध क्षेत्रातील व्यक्ती या आंदोलनात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी झाल्या. यात कलाकारांचाही एक गट होता. या कलाकारांमध्ये दीप सिद्धूही होता. हरियाणा सीमेवरील शंभू या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत तो आंदोलनात सहभागी झाला होता.