कच्च्या पाम तेलाच्या आयात शुल्कात होणार १० टक्के कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

कच्चे खाद्यतेल आणि शुद्ध पाम तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये गेल्या एक महिन्यापासून किंमतींमध्ये घसरण दिसून येत आहे. तरीही देशांतर्गत शुद्ध पाम तेल आणि कच्चे खाद्यतेल यांचे भाव कायम आहेत.

    नवी दिल्ली: कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाच दुसरीकडे महागाईचा भडका उडलेला दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने तर सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. तर आजच सिलेंडरचे दर हे तब्बल २५ रुपयांनी वाढले आहेत. यासगळ्यात गृहिणींना केंद्र सरकारकडून थोडा दिलासा मिळाला आहे. कारण सरकारकडून केंद्र सरकारने तेलांच्या किंमती कमी तयारी दर्शवली आहे. सरकारने कच्च्या पाम तेलाच्या आयात शुल्क १० टक्के करण्याची घोषणा केली आहे.

    ‘कच्चे खाद्यतेल आणि शुद्ध पाम तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये गेल्या एक महिन्यापासून किंमतींमध्ये घसरण दिसून येत आहे. तरीही देशांतर्गत शुद्ध पाम तेल आणि कच्चे खाद्यतेल यांचे भाव कायम आहेत. खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांचे हित लक्षात घेता सरकारने कच्च्या पाम तेलावरील (सीपीओ) शुल्क कमी केले आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

    २९ जून, २०२० रोजी अधिसूचना क्र. ३४ / २०२१ नुसार वित्त मंत्रालयाने सीपीओवरील शुल्क १५ टक्केवरून १० टक्के केले आहे. ३० जून २०२१ आणि ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ही अंमलबजावणी कायम राहील’ असे या आदेशात म्हटले आहे. शुल्क कपातीनंतर, सीपीओवरील कर दर ३०.२५ टक्के असेल ज्यात अतिरिक्त कृषी उपकरांचा १७.५ टक्के आणि समाजकल्याण उपकर १० टक्के असेल. ही कपात परिणामी खाद्य तेलांच्या किरकोळ किंमती खाली आणण्यासाठी मदत करेल. शुल्कात ही कपात ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे.

    सध्या कच्च्या पाम तेलाच्या आयातीवर देशातील सीमा शुल्क १५ टक्के आहे, तर आरबीडी पाम ऑईल, आरबीडी पामोलिन, आरबीडी पाम स्टीरिन आणि इतर पाम तेलांच्या तुलनेत हा दर ४५ टक्के आहे. सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता म्हणाले की, क्रूड पाम तेलावरील आयात शुल्क १५ टक्के वरून १० टक्के करण्यात आले आहे. परंतु कच्च्या पाम तेलावरील प्रभावी शुल्क ५.५० पर्यंत खाली आले आहे आणि ते ३५.७५ टक्केवरून ३०.३५ टक्केवर आले आहे.

    काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत आवक वाढत असल्याने खाद्यतेलांच्या दरात घट झाली होती. आता केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच खाद्यतेल स्वस्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.