हिंदू बहुसंख्य तोपर्यंतच संविधान-महिला सुरक्षित; भाजपा नेत्याचे जाहीर वक्तव्य

'एआयएमआयएम' कर्नाटकातील तालिबान आहे. 'एआयएमआयएम' आणि 'एसडीपीआय'ची विचारधारा तालिबानसारखी आहे. कलबुर्गीचे लोक तालिबानी विचारधारा नाकारून आगामी महानगरपालिका निवडणुकीत ......

  दिल्ली (Delhi) : भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) राष्ट्रीय महासचिव (National General Secretary) सी. टी. रवी (C. T. Ravi) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशात हिंदू बहुसंख्य (Hindu majority) आहेत तोपर्यंतच देशाचे संविधान (constitution) आणि महिला सुरक्षित आहेत, असा दावा रवी यांनी केला. जेव्हापर्यंत या देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी लिहिलेले संविधान सुरक्षित राहील.

  जेव्हापर्यंत हिंदू बहुसंख्य राहतील तोवरच समान संधी उपलब्ध होतील. पण एकदा का हिंदू अल्पसंख्यांक झाले तर गंधार (Gandhar) (अफगाणिस्तान) (Afghanistan) सोबत जे झाले तेच भारतातही होईल, असे रवी यांनी म्हटले.

  ज्या नागरिकांना आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचे संरक्षण करायचे असेल त्यांनी हे ‘सत्य’ विसरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. उल्लेखनीय म्हणजे, संविधानाशी छेडछाड करत नवे कायदे निर्माण करण्याचा आरोप भाजपवर विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला.

  हिंदू अल्पसंख्य होण्याची भीती? (Fear of becoming a Hindu minority)
  धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सहिष्णुता हा हिंदूंचा मूळ विश्वास आहे. जेव्हापर्यंत सहिष्णुतेवर विश्वास असणारे लोक बहुसंख्य राहतील तेव्हापर्यंत धर्मनिरपेक्षता कायम राहील. महिला सुरक्षित राहतील. सहिष्णुता असणाऱ्या लोकांची संख्या घटली तर अफगाणिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होईल. जेव्हा ते (गैर-हिंदू) बहुसंख्यांक होतात तेव्हा ते शरीयत कायदा लागू करण्याच्या गोष्टी करतात, आंबेडकरांच्या संविधानाच्या नाही, अशी भीतीही भाजपा नेत्याने जाहीर भाषणात व्यक्त केली.

  एआयएमआयएमची तुलना तालिबानसोबत (Comparison of AIMIM with Taliban)
  भाजपा नेते रवी यांनी यावेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’ (एआयएमआयएम) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) च्या विचारधारेची तुलना तालिबानशी केली. ‘एआयएमआयएम’ कर्नाटकातील तालिबान आहे. ‘एआयएमआयएम’ आणि ‘एसडीपीआय’ची विचारधारा तालिबानसारखी आहे. कलबुर्गीचे लोक तालिबानी विचारधारा नाकारून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपालाच बहुमताने जिंकून आणतील, असे आवाहनही रवी यांनी जनतेला केले.