Controversial statement by a senior BJP leader regarding jeans worn by women; Said ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात रावत यांनी आक्षेप घेतला आहे.

    दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात रावत यांनी आक्षेप घेतला आहे.

    आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत” असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असंही ते म्हणाले.

    तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.