‘ अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास कोरोनाचे संकट नष्ट होईल’ सपाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचे वादग्रस्त विधान

सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेडछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलींना पकडून देत त्यांच्या बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे कोरोनासारखं मोठं संकट देशात आलं आहे. आम्ही मुस्लिमांना मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही. या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत, असंही शफीकुर्रहमान यांनी म्हटलं आहे.

    दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्याप्रमाणात जीवित हानी झाली. संसर्ग थोपवण्यासाठी आयोग्ययंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यास सांगितले जात आहे. प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र अजूनही काही राजकीय नेते वादग्रस्त वक्तव्य करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताना दिसून आहेत. तर काही कोरोनाला घालवण्यासाठी अजब उपाय करण्यासही सांगत आहेत. अशातच

    'कोरोना हा काही आजार नाही. कोरोना जर आजार असता तर जगात त्यावर काहीती उपाय असता. कोरोनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट आहे', अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट नष्ट होईल.

    समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq)

    इतकेच नव्हे तर शफीकुर्रहमान बर्क यांनी यांनी भाजपा सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेडछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलींना पकडून देत त्यांच्या बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे कोरोनासारखं मोठं संकट देशात आलं आहे. मी गेल्याच वर्षी कोरोना हा काही आजार नसल्याचं म्हटलं होतं. आजार असता तर त्यावर उपाय असता, पण असं कोरोनासंदर्भात नाहीय. अल्लाहसमोर रडत रडत आपल्या चुकींसाठी माफी मागणं हा कोरोनावर मात करण्याचा, त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे.

    आम्ही मुस्लिमांना मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही. या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत