लस मिळाली तरी कोरोनावर मात करणे अशक्य, जागतिक आरोग्य संघटनेचा खळबळजनक दावा

टेड्रोस घेब्रेसेस म्हणाले की, कोरोनासी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. मात्र त्यांची जागा घेऊ शकणार नाही. केवळ ही लस ही स्वतः कोरोना महामारी संपवू शकत नाही. तसेच कोरोनाचे विषाणू काही येत्या काही काळातही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली : जगभरात कोरोना (Corona) व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी २०० पेक्षा अधिक औषधी कंपन्यांमद्ये परिक्षण सुरु आहे. काही देशांतील कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) प्रमुखांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. कोरोना लस (vaccin) आली तरी कोरोना व्हायरसचे संकट टळणार नाही. असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस यांनी केले आहे.(Corona is impossible to overcome even if vaccinated)

टेड्रोस घेब्रेसेस म्हणाले की, कोरोनासी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. मात्र त्यांची जागा घेऊ शकणार नाही. केवळ ही लस ही स्वतः कोरोना महामारी संपवू शकत नाही. तसेच कोरोनाचे विषाणू काही येत्या काही काळातही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार आहे.

सुरुवातीला कोरोना लसीचा पुरवठा हा मर्यादीत असेल त्यामुळे पहिले आरोग्य कर्मचारी, वृद्ध लोक आणि इतर लोकांना प्राधान्य दिले जाईल. यामुळे मृत्यूची संख्या काही प्रमाणात कमी होईल. आणि आरोग्य यंत्रणेला कोरोनाशी लढण्यास मदत होईल. असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस यांनी म्हटले आहे.